

A Flydubai passenger aircraft made an emergency landing at Tabuk Airport after an incident involving two pilots.
esakal
तेल अविव, : संयुक्त अरब अमिरातीहून इस्राईलला जाणाऱ्या प्रवासी विमानात दोन वैमानिकांमध्ये चाकूने हाणामारी झाल्यानंतर विमान आपत्कालीन परिस्थितीत सौदी अरेबियातील ताबुक विमानतळावर उतरविण्यात आले. जिहादी दहशतवाद्यांनी इस्राईलमध्ये विमान कोसळवून इस्रायली प्रवाशांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा दावा इस्राईलने केला आहे. इस्राईलने आपली काही लढाऊ विमानेही सौदीच्या दिशेने रवाना केली होती. हल्लेखोर वैमानिकाला अटक झाली असून जखमी वैमानिकावर उपचार सुरू आहेत.