प्रत्येकाला मिळणार जास्तीचे 5 किलो धान्य, तर गरिबांसाठी 1.7 लाख कोटींचे पॅकेज

वृत्तसंस्था
Thursday, 26 March 2020

शेतकऱ्यांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच पंतप्रधान योजनेतील पैसे दिले जाणार आहेत. त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येतील. तसेच मनरेगामधील मजुरांनाही मदत करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूविरुद्ध लढाई लढत असलेल्या डॉक्टर, नर्स, आशा वर्कर्स यांच्यासाठी प्रत्येकी 50 लाखांचा विमा उतरविण्यात आला असून, गरिब नागरिकांसाठी 17 लाख कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

सकाळचे ऍप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. सीतारामन म्हणाल्या, की पुढील तीन महिन्यांसाठी प्रत्येक माणसासाठी पाच किलो गहू आणि तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. तसेच एक किलो दाळही मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे गरिबांचे हाल होणार नाहीत. त्यांना आवश्यक ते धान्य मिळेल. यापूर्वी पाच किलो धान्य देण्यातच येत होते. आता आणखी पाच-पाच किलो गहू व तांदुळ देण्यात येणार आहे. 

सीतारामन म्हणाल्या, की कोरोनाविरुद्धच्या लढाई लढत असलेल्यांना मी सलाम करते. आशा वर्कर्स, नर्स, डॉक्टर्स यांचे मी कौतुक करते. मानवतेच्या भावनेतून हे सर्व काम करत आहेत. आम्ही या सर्वांसाठी 50 लाखांचा विमा जाहीर करत आहोत. परराज्यातून नोकरीनिमित्त आलेल्या नागरिकांना सर्वोतोपरी मदत पोहचविली जाणार आहे. भूकेने कोणाची बळी जाऊ नये हेच उद्दीष्ट आहे. शेतकरी, मनरेगा, गरिब, दिव्यांग, जनधन, उज्वला खाते असलेल्या महिला यांना मदत केली जाईल. 

शेतकऱ्यांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच पंतप्रधान योजनेतील पैसे दिले जाणार आहेत. त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येतील. तसेच मनरेगामधील मजुरांनाही मदत करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FM Nirmala Sitharaman announces package for poor people Corona Virus