Union Budget 2023 : बजेटबरोबरच चर्चा अर्थमंत्र्यांच्या लाल साडीची, या राज्याशी आहे खास नातं

2019 ते 2022 निर्मला सीतारमण यांच्या साड्या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत.
FM Nirmala Sitharaman dons bright red saree for Union Budget 2023
FM Nirmala Sitharaman dons bright red saree for Union Budget 2023esakal

2019 ते 2022 निर्मला सीतारमण यांच्या साड्या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. यावर्षी कोणती साडी? असा सवाल नेटकरी उपस्थित करत आहेत. पुढील काही तासात 2023-24 च्या अर्थसंकल्पाला सुरुवात होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण दरवर्षी प्रमाणे बजेट सादर करणार आहे. सगळ्या देशाचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे आहे . पण यासोबतच निर्मला सीतारमण यांच्या साडीवर देखील लोकांचं लक्ष आहे. (FM Nirmala Sitharaman dons bright red saree for Union Budget 2023)

यंदाच्या वर्षी त्यांनी तपकिरी बॉर्डरची लाल रंगाची साडी परिधान केली आहे. दरवर्षी बजेट सादर करताना निर्मला सीतारमण जी साडी नेसतात. ती साडी नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबलपुरी सिल्क साडी परिधान केली आहे. या टेंपल साडीदेखील म्हणतात. ओरिसा राज्याशी या साडीचं खास नातं आहे.

२६ जानेवारीला त्यांनी नॉर्थ ब्लॉकमध्ये प्री-बजेट हलवा समारंभात हिरव्या आणि पिवळ्या कांजीवरम साडीत परिधान केली होती. विशेष प्रसंगी, त्या बहुतेक संबलपुरी, इकत, कांजीवरम साड्यांमध्ये दिसतात.

ओडिशाची संबळपुरी साडी


बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्याला असणाऱ्या ओडिशा या राज्यात विणल्या जाणाऱ्या अनेक साड्यांना संबळपुरी म्हणतात.अर्थातच संबळपूर नावाच्या गावामध्ये हातमागावर ही साडी तयार होते.

संबळपूरच्या आजूबाजूला बारगढ, बारपल, बालंगीर जिल्हा, बौध जिल्हा या गावांमधूनही संबळपुरी साड्या तयार होतात. पण त्या त्या गावांनी आपली स्वत:ची ओळख म्हणूत त्या साडीमध्ये काही लहान वैशिष्ट्ये घातली आणि त्यातून संबळपुरी या एकाच साडीचे चार ते सहा वेगवेगळे प्रकार तयार झाले. त्यांना नावं मात्र त्या त्या गावांवरून देण्यात आली.

इसवी सन 1192 मध्ये उत्तर भारतामधून चौहानांच्या राज्याचा अस्त झाल्यानंतर तिथला भुलिया समाज पूर्व भारतात जिथे मुघलांचं राज्य होतं तिथे म्हणजे आताच्या ओडिशामध्ये स्थायिक झाला. तेव्हापासून 1925 सालापर्यंत या भुलिया समाजानं इथे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या विणून ही कला नावारुपाला आणली. पूर्वी या साड्या थायलंड आणि इंडोनेशीया या देशांमध्येही निर्यात व्हायच्या, असे उल्लेख आहेत.

त्या काळी त्या साड्यांना भुलिया कपटा म्हणजे भुलियांनी विणलेलं वस्त्र असं म्हणायचे.

पण नंतर काळाच्या ओघात त्याला संबळपूर गावावरून संबळपुरी नाव पडलं आणि 1980 च्या दशकात तेव्हाच्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या साड्या वापरल्यामुळे सगळ्या भारतातच त्या प्रसिद्ध झाल्या.

2019 मध्ये पदभार स्वीकारल्यापासून, केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री दरवर्षी हॅन्डलूम साडी वापरताना पाहायला मिळतात.

नीर्मला सीतारमण यांनी फायनान्स मिनिस्टर झाल्यानंतर 2019 साली पहिल्याच बजेटला गुलाबी रंगाची आणि सोनेरी बॉर्डरची साडी नेसली होती. या साडीला मंगलागिरी साडी असं म्हणतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com