गोवा, त्रिपुराऐवजी बंगालकडे लक्ष द्या; भाजपच्या नेत्याचा तृणमूल काँग्रेसला टोला | West bengal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

desh
गोवा, त्रिपुराऐवजी बंगालकडे लक्ष द्या; भाजपच्या नेत्याचा तृणमूल काँग्रेसला टोला

गोवा, त्रिपुराऐवजी बंगालकडे लक्ष द्या; भाजपच्या नेत्याचा तृणमूल काँग्रेसला टोला

कोलकता : पश्चिम बंगालमधील(west bengal) लोकांना रोजगाराच्या शोधासाठी राज्याबाहेर जावे लागू नये म्हणून तृणमूल काँग्रेसने गोवा(goa), त्रिपुराऐवजी(Tripura) आपल्या राज्याकडे लक्ष द्यावे, असा टोला भाजपचे उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी सत्ताधारी पक्षाला लगावला आहे.त्यांनी सांगितले की, ईशान्येकडील राज्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर तृणमूलला काहीच वाव नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता त्रिपुरा किंवा गोवा येथे तृणमूल काँग्रेसची भरभराट होणार का हे नंतर दिसेलच, पण या घडीला तृणमूलने बंगालच्या विकासाकडे लक्ष द्यायला हवे. राज्यातील अनेक प्रकल्पांचे काम ठप्प झाले आहे. नियोजन आणि निधीचा अभाव असल्यामुळे हे घडते आहे. ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) यांचा दुआरे सरकार (सरकार आपल्या दारी) हा उपक्रम रविवारी सुरु होणार होता, पण निधीअभावी तो रद्द करण्यात आला.

हेही वाचा: Podcast: मलिकांनी फोडला 'ऑडिओ क्लिप'चा बॉम्ब ते सरकारी वाहनं असणार इलेक्ट्रिक

ममता बॅनर्जी यांनी तृणमूलची व्याप्ती राष्ट्रीय पातळीवर वाढविण्याचा संकल्प सोडला आहे. देशाच्या विविध भागांत पक्षाचा विस्तार व्हावा म्हणून प्रयत्न सुरु आहेत. गोवा आणि त्रिपुरा या राज्यांतील निवडणूका लढविण्यामागे हाच उद्देश आहे.

घोष यांनी तिजोरी तपासली का?

दिलीप घोष यांच्या टीकेचा तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी समाचार घेतला. घोष यांनी बंगाल सरकारची तिजोरी तपासली आहे का, असा सवाल करून ते म्हणाले की, दुआरे सरकार उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी प्रामुख्याने महिलांसह अनेक लोक मोठ्या संख्येने रांगा लावतात. विधवा, वृद्ध नागरिक निवृत्तिवेतन योजनांसाठीही हेच होते. गर्दी टाळण्यासाठीच आम्ही हा उपक्रम रद्द केला. राज्य सरकारचा हा निर्णय योग्यच आहे.

हेही वाचा: मुलांच्या लसीकरणासाठी वाढता प्रतिसाद; साडेसहा लाखांहून अधिक नोंदणी

त्रिपुरामध्ये तृणमूल काँग्रेसला काहीही वाव नाही, तरिही अभिषेक बॅनर्जी तेथे का जात आहेत? असा पक्ष त्रिपुरात तग धरू शकणार नाही असे तेथील जनतेने याआधीच स्पष्ट केले आहे.

- दिलीप घोष, भाजप उपाध्यक्ष

Web Title: Focus On Bengal Instead Of Goa Tripura Says Bjp Leader Lashes Out At Trinamool Congress

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..