प्रवासात नियम पाळा अन्यथा कैद; रेल्वेची एसओपी जारी 

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 16 October 2020

रेल्वेने सणासुदीच्या काळात ३९२ विशेष गाड्या (१९६ जोड्या) सोडण्याचे ठरविले आहे. त्यामुळे कोरोना संकट कायम असले तरी कुटुंबीयांसमवेत सण साजरा करण्यास मिळणार, या शक्‍यतेने अनेकजण आनंदी झाले आहेत.

नवी दिल्ली - छठ पूजा, दसरा, दिवाळी या सणांच्या काळात रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येत असताना प्रवासादरम्यान एखाद्या प्रवाशाने कोरोना आरोग्य नियमांचे उल्लंघन केल्यास त्यास दंड व एक ते पाच वर्षाच्या कैदेची शिक्षा होऊ शकते, असा इशारा रेल्वेने दिला आहे. रेल्वे कायद्याच्या १४५ व्या कलमाखाली खटला भरला गेला तर संबंधित प्रवाशाचा सण कारागृहातच साजरा होण्याची शक्‍यता अधिक आहे. 

प्रवाशांकडून मास्क, सॅनिटायजर व सुरक्षित अंतरभानाच्या नियमांचे पालन होते की नाही यावर नजर ठेवण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या विशेष तुकड्या ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रेल्वेने सणासुदीच्या काळात ३९२ विशेष गाड्या (१९६ जोड्या) सोडण्याचे ठरविले आहे. त्यामुळे कोरोना संकट कायम असले तरी कुटुंबीयांसमवेत सण साजरा करण्यास मिळणार, या शक्‍यतेने अनेकजण आनंदी झाले आहेत. मात्र रेल्वे प्रवास करताना मास्क योग्य रीतीने लावला नसेल, स्थानक परिसरात किंवा स्थानकांवर, गाडीत अस्वच्छता पसरविणे, थुंकणे चालूच असेल, अशांना किंवा गर्दी जमविली तरी संबंधितांना कडक कारवाईला सामोरे जावे लागू शकते. रेल्वे पोलिस दलाने याबाबतची नियमावली (एसओपी) जारी केली आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोना लपवल्यास कडक कारवाई 
कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे लपवून एखादा प्रवास करताना आढळला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर रेल्वे कायदा कलम १४५ (नशापाणी केले तसेच आरोग्य नियम तोडले तर ), १५३ व १५४ (जाणूनबुजून बेपवाई करून सहप्रवाशांच्या आरोग्यास धोका पोहचविला तर) अंतर्गत त्या प्रवाशांवर कारवाई होईल. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तेजस उद्या पुन्हा धावणार 
देशातील पहिली कार्पोरेट रेल्वे, तेजस एक्‍स्प्रेस तब्बल साडेसात महिन्यांनंतर येत्या १७ ऑक्‍टोबरपासून (शनिवार) पुन्हा धावणार आहे. दिल्ली-लखनौ मार्गावर ही पहिली गाडी धावेल. एकाआड एक आसनांवर आसन व्यवस्था व कोरोना आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण प्रवासी क्षमतेच्या ६० टक्के जागांचीच तिकीट विक्री केली जाईल. प्रवाशांचा १० लाखांचा रेल्वे प्रवासी विमा उतरविण्यात येईल. त्याच दिवशी नवरात्र सुरू होत असल्याने प्रवाशांना उपवासाचे पदार्थही देण्याची सुविधा रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे. 

राज्यातून सुटणाऱ्या काही गाड्या 
-मुंबई सेंट्रल-निजामुद्दीन ऑगस्ट क्रांती राजधानी (दररोज) 
- लोकमान्य टिळक टर्मिनस ते नाशिक-दिल्ली-हरिद्वार एसी एक्‍स्प्रेस (आठवड्यातून दोनदा-सोमवार-गुरुवार) 
- लोकमान्य टिळक टर्मिनस- लखनौ एसी एक्‍स्प्रेस - (साप्ताहिक) 
- अजनी- पुणे (साप्ताहिक) 
- निजामुद्दीन-पुणे एसी एक्‍स्प्रेस(आठवड्यातून दोनदा) 
-निजामुद्दीन पुणे दुरांतो एक्‍स्प्रेस (आठवड्यातून दोनदा) 
- हावडा- पुणे दुरांतो (आठवड्यातून दोनदा) 
- नागपूर-अमृतसर (साप्ताहिक) 
- कामाख्या- लोकमान्य टिळक टर्मिनस -एसी एक्‍स्प्रेस (साप्ताहिक) 
-वांद्रा टर्मिनस-निजामुद्दीन युवा एक्‍स्प्रेस(साप्ताहिक) 
चेअर कार एसी एक्‍स्प्रेस 
-मुंबई सेंट्रल - अहमदाबाद शताब्दी (रविवार सोडून दररोज) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Follow the rules in travel otherwise imprisoned; Railway SOP issued

Tags
टॉपिकस
Topic Tags: