लोकसभेत शिवसेनेचा गट स्थापणार; CM शिंदेंनी मांडली खासदारांची भूमिका

दोन प्रमुख विषयांवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत दाखल झाल्याचं मुख्यंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
Maharashtra Politics Eknath shinde group New National Executive of Shiv Sena  Uddhav Thackeray mumbai
Maharashtra Politics Eknath shinde group New National Executive of Shiv Sena Uddhav Thackeray mumbai

नवी दिल्ली : लोकसभेत शिवसेनेचा गट स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यासाठी लोकसभा अध्यक्षांना १२ खासदारांचं पत्र दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाबाबत उद्या सुनावणी सुरु असल्यानं त्याबाबतची चर्चा झाल्याचं यावेळी शिंदे यांनी सांगितलं. महाराष्ट्र सदन इथं पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (for establish Shiv Sena faction in Lok Sabha CM Eknath Shinde presented role of MPs aau85)

Maharashtra Politics Eknath shinde group New National Executive of Shiv Sena  Uddhav Thackeray mumbai
नदीत कोसळल्यानंतर बस चेपली; आत १० मृतदेह अन्...; प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार

शिंदे म्हणाले, लोकसभा अध्यक्षांकडे लोकसभेचा गट तयार करण्याचं १२ जणांचं पत्र दिलं. त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. याबाबत बैठक आणि चर्चा पार पडली. हे दोन विषय महत्वाचे असल्यानं मी दिल्लीत आलो होतो. प्रथम मी शिवसेनेच्या १२ खासदारांचं स्वागत करतो. त्यांनी घेतलेली भूमिका ही बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका आहे. ही भूमिका घेऊन आम्ही महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचं सरकार स्थापन केलं आहे.

Maharashtra Politics Eknath shinde group New National Executive of Shiv Sena  Uddhav Thackeray mumbai
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग; शिंदे गटाला पुन्हा द्यावं लागणार पत्र?

आम्ही ५० आमदारांनी घेतलेल्या भूमिकेचं समर्थन राज्यभरातून शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील जनतेनं त्याचं समर्थन केलं आहे. सन २०१९च्या सार्वत्रिक निवडणूकीत आम्ही एकत्रित लढलो होतो. त्यामुळं अडीच वर्षांपूर्वी जे शिवसेना-भाजप युतीचं सरकार महाराष्ट्रात येणं अपेक्षित होतं ते आता आम्ही स्थापन केलं आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांचं कर्ज, पेट्रोल-डिझेलवरील कर्ज कमी करण्याबरोबत शेतजमिनी ओलिताखाली आणण्याचे निर्णय घेतले. आमच्या या निर्णयांना केंद्र सरकारने पूर्ण पाठिंबा दिला, असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com