परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना चाचणीची सक्ती नाही : केंद्र सरकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Air Plane
परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना चाचणीची सक्ती नाही : केंद्र सरकार

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना चाचणीची सक्ती नाही : केंद्र सरकार

नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या परिस्थितीत सुधारणा होत असल्याने केंद्र सरकारने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणीची  सक्ती आणि गृह विलीगीकरणाची  अट १४ फेब्रुवारीपासून रद्द करण्याचा निर्णय घेतला.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या दिशानिर्देशांनुसार दक्षिण अफ्रिका व   'अॅट रिस्क' गटांच्या अन्य देेशांसाठीची ही वर्गवारीही रद्द होणार आहे. परदेशातून  येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचण्यांची सक्ती रद्द झाली  तरी प्रवाशांना संबंधित देशांतील कोरोना आरटीपीसीआर चाचणीचे किंवा दोन्ही टप्प्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र भारतातील विमानतळांवरच सादर करावे लागेल. 

विमानतळांवरच चाचण्या करणे, भारतात मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर सात दिवसांचे सक्तीचे गृह विलीगीकरण हे नियमही रद्द करण्यात आले आहेत. मात्र या प्रवाशांना १४ दिवस स्वतःच्या आरोग्याकडे स्वतःच लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. भारतात येऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांनी https://www.newdelhiairport.in/airsuvidha/apho-registration या विमान प्रवास सुविधा पोर्टलवरील स्वतःच्या संपूर्ण माहितीचा अर्ज भरणे आवश्यक आहे. त्यात गेल्या १४ दिवसांत त्यांनी केलेल्या प्रवासाचे तपशील देणे आवश्यक राहणार आहे.

भारताने ७२ देशांच्या लसीकरण मोहीमांना परस्पर सामंजस्य कार्यक्रमांतर्गत मान्यता दिली आहे. या ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांवरील विमान प्रवास अटी प्राधान्याने शिथिल करण्यात येणार आहेत. या यादीत कॅनडा, हाँगकाँग, अमेरिका, ब्रिटन, बहारीन, कतार, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व बहुतांश युरोपीय देशांचा समावेश आहे. प्रवासांदरम्यान मास्क लावणे, सुरक्षित अंतरभानाच्या नियमाचे पालन आवश्यक असेल.

Web Title: Foreign Airplane Traveler Corona Testing

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Travelforeigners
go to top