Viral Video : मुलासोबत अमेरिकेतल्या रेस्टॉरंटमध्ये गेलो तेव्हा...', परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितला किस्सा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

foreign minister s jaishankar

आपल्या मुलाकडे ते अमेरिकेला गेले होते, तेव्हा तेथील एका रेस्टॉरंटमध्ये हा किस्सा घडला होता.

Jaishankar : मुलासोबत अमेरिकेतल्या रेस्टॉरंटमध्ये गेलो तेव्हा...', परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितला किस्सा

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी एक मजेदार किस्सा सांगितला आहे. 2021 मध्ये कोरोना महामारीच्या काळात जेव्हा विमान सेवा पुन्हा सुरू झाली तेव्हा ते अमेरिकेला गेले होते. तेथील एक किस्सा त्यांनी सांगितला आहे. आपल्या मुलाकडे ते अमेरिकेला गेले होते. तेव्हा तेथील एका रेस्टॉरंटमध्ये हा किस्सा घडला होता.

परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा अमेरिकेत राहतो. तिकडे गेलो असता मुलगा आणि आम्ही सर्वजण एका रेस्टॉरंटमध्ये गेलो. त्यावेळी कोविड लसीकरणाचे प्रमाणपत्र आहे का अशी विचारणा करण्याली आली. यानंतर मी लगेचच माझ्या मोबाईलवरील लसीचे प्रमाणपत्र दाखवले. आणि माझ्या मुलाने त्याच्या पाकिटातून एक कागद काढला जो थोडा दुमडलेला होता आणि म्हणाला की हे माझे प्रमाणपत्र आहे.

हेही वाचा: Khurpi : देशातील एक निसर्ग सुंदर गाव जिथे प्रवेशासाठी मोजावे लागतात फक्त 20 रुपये

यानंतर मी त्याचा पेपर पाहिला आणि स्वतःलाच म्हणालो, ठीक आहे... ते (अमेरिका) कुठे आहेत आणि आपण कुठे आहोत, याचा प्रत्यय मला त्यावेळी आला. त्यांनी हसत हसत असा एक किस्सा शेअर केला आहे. दरम्यान, हा किस्सा सांगण्यामागे परराष्ट्र मंत्र्यांना भारताच्या Cowin App (CoWIN) चा संदर्भ द्यायचा होता. जयशंकर म्हणतात की, कोविन अॅपची कल्पना ही नागरिकांना उपयोगी आहे. तुम्ही सर्वजण फक्त फोन घेऊन कोणत्याही तारखेला कुठेही जाऊ शकता आणि तुमचे कोविड लसीकरण प्रमाणपत्राचे काम पूर्ण होऊ शकते. भारतासारखी ही व्यवस्था जगातील बहुतांश देशांमध्ये नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितले.

CoWIN हे भारताच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मालकीचे आणि त्यांनी ऑपरेट केलेले अॅप आहे. या अॅपद्वारे कोविड-19 लसीकरणाच्या नोंदणीपासून ते लसीकरणाशी संबंधित सर्व कामं एकाच प्लॅटफॉर्मवर घरी बसून करता येतात. तुम्ही जगभरात कुठेही तुमचे COVID लस प्रमाणपत्र दाखवण्यासाठी त्याचा वापरू शकता.

हेही वाचा: Foreign : परदेशात भारतीय कामगारांसाठी मागणी वाढली, 10 वी नापास झालेल्यांनाही संधी

Web Title: Foreign Minister S Jaishankar With His Son In Us Restaurant Viral Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..