Varanasi–Bangkok flight
sakal
सांस्कृतिक राजधानी वाराणसी आता आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर अधिक वेगाने चमकणार आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने वाराणसी ते बँकॉक अशी थेट विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केली असून १ फेब्रुवारी २०२६ पासून या विमानांचे उड्डाण होईल. लखनौमधील सेवा बंद केल्यानंतर एअरलाइन्सने वाराणसीला आपले नवे केंद्र (हब) म्हणून निवडले आहे.