esakal | राजस्थान राजकीय संघर्ष; गेहलोतांनी मागितली माफी
sakal

बोलून बातमी शोधा

Forget and Forgive Says CM Ashok Gehlot after MLA Meeting

सचिन पायलट (Sachin Pilot) आणि अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या गोटातील आमदारांच्या झालेल्या एकत्रित बैठकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माफी मागितली आहे. तर पायलट समर्थक आमदारांनी कसोटी सामना अखेर रद्द झाल्याचे सांगितले.

राजस्थान राजकीय संघर्ष; गेहलोतांनी मागितली माफी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जयपूर : राजस्थानमध्ये (Rajsthan) गेल्या अनेक दिवसांपासून चालत असलेला राजकीय संघर्ष काही केल्या शमण्याचे नाव घेत नव्हता. मात्र, आता तो शांत झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सचिन पायलट (Sachin Pilot) आणि अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या गोटातील आमदारांच्या झालेल्या एकत्रित बैठकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माफी मागितली आहे. तर पायलट समर्थक आमदारांनी कसोटी सामना अखेर रद्द झाल्याचे सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अशोक गेहलोत म्हणाले, 'झालेल्या गोष्टी सर्वजण विसरुन जाऊ, काही चुकले असेल तर माफ करा. (Forget and Forgive Says CM Ashok Gehlot) राज्याच्या हितासाठी काम करू आणि पुढे जाऊ. लोकशाहीच्या हितासाठी मोठे काम करुया असेही गेहलोत यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे सचिन पायलट समर्थक आमदार विश्वेंद्र सिंह म्हणाले की, हा कसोटी सामना होता आणि तो अनिर्णित राहिला आहे. आम्ही बंडखोर नाहीत, आम्ही पक्षाच्या विरोधात कुठलेही पाऊल उचलले नाही. मी सहज म्हटले होते की, हा कसोटी सामना आहे. पण, आता तो अनिर्णित राहिला असून आम्ही सर्वजण तंबूत परतलो आहोत. असेही ते म्हणाले.

आमदारांच्या बैठकीनंतर अशोक गेहलोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ही लढाई लोकशाहीच्या भल्यासाठी आहे. आमच्या आमदारांनी त्याला साथ दिली आहे. १०० पेक्षा जास्त आमदारांनी एकसोबत एवढा काळ एका पक्षासोबत कठीण काळात काढणे ही खूप मोठी गोष्ट आहे. भारताच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले असावे. लोकशाही वाचविण्यासाठीची ही लढाई पुढील काळही अशीच चालू राहील. आता आपण सर्वजण एकत्र पुढे जाऊ, असेही गेहलोत यांनी पायलट समर्थक आमदारांना उद्देशून म्हटले. राज्यातील लोकांनी आपल्याला विश्वासाने मतदान केले असून आपल्या सरकारवर त्यांचा विश्वास आहे. तो कायम ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असेही त्यांनी सांगितले. 

हा राजस्थानच्या लोकांचा विजय असून राज्याच्या हितासाठी सरकार स्थिर असणे गरजेचे आहे. सरकार स्थिर असेल तर आपण मोठ्या हिंमतीने राज्यातील लोकांची सेवा करु शकू. आपल्या गोटातील आमदारांच्या नाराजीवर बोलताना गेहलोत म्हणाले, त्यांची नाराजी स्वाभाविक आहे. ज्या पद्धतीने हे नाट्य घडले, अशा परिस्थितीत त्यांचे नाराज होणे अपेक्षितच होते. परंतु, आता त्या सर्व आमदारांची समज काढण्यात यश आले असून पक्षात कोणत्याही प्रकारची आता नाराजी नाही. त्या आमदारांनी राज्याच्या विकासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले आहे.