माजी लष्करप्रमुख सुनीथ रॉड्रिग्स यांचं निधन; भारतीय लष्करानं वाहिली श्रद्धांजली I Indian Army | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SF Rodrigues

'रॉड्रिग्स हे रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी देशासाठी अपार कष्ट केलेत.'

माजी लष्करप्रमुख सुनीथ रॉड्रिग्स यांचं निधन; भारतीय लष्करानं वाहिली श्रद्धांजली

माजी लष्करप्रमुख जनरल एसएफ रॉड्रिग्स (SF Rodrigues) यांचं आज निधन झालं. रॉड्रिग्स यांचा जन्म 1933 मध्ये मुंबईत झाला. 1990 ते 1993 या काळात ते भारतीय लष्कराचे प्रमुख होते. 8 नोव्हेंबर 2004 रोजी त्यांची पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारतीय लष्करानं ट्विटद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिलीय. लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे (Army Chief General MM Naravane) आणि भारतीय लष्कराच्या सर्व श्रेणीतील जनरल्सनी सुनीथ फ्रान्सिस रॉड्रिग्स (Sunith Francis Rodrigues) यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय.

भारतीय लष्करानं ट्विट केलंय की, रॉड्रिग्स हे रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी देशासाठी अपार कष्ट केलेत. रॉड्रिग्स 1949 मध्ये भारतीय लष्करी अकादमीच्या संयुक्त सेवा शाखेत सामील झाले आणि 28 डिसेंबर 1952 रोजी आर्टिलरी रेजिमेंटमध्ये ते नियुक्त झाले. अनेक फील्ड आणि ऑटोमॅटिक आर्टिलरी युनिट्समध्ये सेवा दिल्यानंतर, रॉड्रिग्सनी 1964 मध्ये आर्टिलरी एअर ऑब्झर्व्हेशन (Artillery Air Observation) पोस्टवर पायलट प्रशिक्षणासाठी अर्ज केला होता.

हेही वाचा: 'आता परवानगीशिवाय CBI ला तपास करता येणार नाही'

1964 ते 1969 दरम्यान त्यांनी विमान आणि हेलिकॉप्टरवर 158 पेक्षा जास्त उड्डाण तास नोंदवले. यात 1965 च्या युद्धात 65 तासांच्या लढाऊ उड्डाणाचा समावेश होता. ब्रिगेडियर (Brigadier) म्हणून एसएफ रॉड्रिग्स यांनी 1975 ते 1977 या काळात माउंटन इन्फंट्री ब्रिगेडचं नेतृत्व केलंय. तर 1971 मध्ये पाकिस्तानशी (Pakistan) झालेल्या युद्धानंतर त्यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी 'विशिष्ट सेवा पदक' देण्यात आलंय.

Web Title: Former Army Chief General Sunith Francis Rodrigues Died

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top