esakal | माजी अ‍ॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचं कोरोनामुळे निधन

बोलून बातमी शोधा

Soli Sorabjee

१९७१मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली.

माजी अ‍ॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचं कोरोनामुळे निधन
sakal_logo
By
एएनआय वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताचे माजी अ‍ॅटर्नी जनरल आणि प्रख्यात न्यायाधीश सोली जहांगीर सोराबजी यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी आज सकाळी निधन झाले. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते.

१९५३मध्ये त्यांनी बॉम्बे हाय कोर्टमध्ये सरावास सुरवात केली होती. १९७१मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९८९-९० मध्ये त्यांची देशाचे अ‍ॅटर्नी जनरल म्हणूनन नियुक्ती करण्यात आली. १९९८ ते २००४ मध्येही त्यांनी अ‍ॅटर्नी जनरल म्हणून काम पाहिले होते.