शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी आज स्वीकारणार हिंदू धर्म

wasim rizvi
wasim rizviesakal

मुंबई : शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे (shia waqf board) माजी अध्यक्ष वसीम रिझवी (Wasim Rizvi) इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म (hindu religion) स्वीकारणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रिझवी आज सकाळी 10.30 वाजता गाझियाबादमधील दसना देवी मंदिरात हिंदू धर्म स्वीकारणार आहेत. (Wasim Rizvi will Accept Hindu religion).

मृत्यूनंतर मला दफन करू नये, तर...

नरसिंहानंद गिरी महाराज त्यांना पूर्ण विधींसह हिंदू धर्मात विलीन करतील. वसीम रिझवी यांनी काही दिवसांपूर्वीच मृत्यूपत्र जारी केले होते. त्यात त्यांनी मृत्यूनंतर मला दफन करू नये, तर हिंदू रितीरिवाजांनुसार माझ्यावर अंत्यसंस्कार करावेत, अशी घोषणा केली होती. यती नरसिंहानंद यांनी माझ्या चितेला अग्नी द्यावी असेही ते म्हणाले होते. दसना देवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद गिरी महाराज त्यांचं धर्मपरिवर्तन करणार आहेत.

wasim rizvi
'भारताच्या स्कॉटलंड' आणि 'मिनी इस्रायल'मध्ये करा नववर्षाचं स्वागत

मला ठार मारण्याचा आणि शिरच्छेद करण्याचा कट रचला जात आहे, असा व्हिडिओ रिझवी यांनी जारी केला होता. माझा गुन्हा एवढाच आहे की मी कुराणातील 26 श्लोकांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले . मुस्लिमांना मला मारायचे आहे आणि त्यांनी मला कोणत्याही कब्रस्तानात जागा देणार नाही असे जाहीर केले आहे. त्यामुळे मी मेल्यानंतर माझ्यावर अंत्यसंस्कार करावेत, असं त्यांनी यात म्हटलं होतं.

wasim rizvi
नागालँड गोळीबार दुर्घटना : मृतांचा आकडा १४ वर, हत्येचा गुन्हा दाखल

कट्टरपंथी मुस्लीम अनेकदा वसीम रिझवी यांना लक्ष्य करतात. कुराणातील २६ श्लोक काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, ती फेटाळण्यात आली होती. तेव्हापासून रिझवी मुस्लिम संघटनांच्या निशाण्यावर आहेत. रिझवी यांचा इस्लाम आणि शिया समाजाशी काहीही संबंध नसल्याचेही मुस्लीम संघटनांचे म्हणणे आहे. मुस्लिम संघटना रिझवी यांचे मुस्लिमविरोधी संघटनांचे एजंट म्हणून वर्णन करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com