छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 मे 2020

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अजित जोगी यांचे आज निधन झाले.गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

रायपूर : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अजित जोगी यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अजित जोगी यांचे चिरंजीव अमित जोगी यांनी ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या संदर्भात त्यांच्यावर उपचार सुरू असलेल्या हॉस्पिटलच्या वतीने एक मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार दुपारी दीडच्या सुमारास त्यांची प्रकृती आणखी खालावली होती. त्यांना आणखी एक हृदयविकाराचा झटका आला होता. दुपारी दोनपर्यंत त्यांना वाचवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. परंतु. डॉक्टरांच्या प्रयत्नांना अपयश आले. दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जोगी यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 मे रोजी आपल्या निवासस्थानी व्हिलचेअर वरून बागेत फेरफटका मारत असताना अजित जोगी बेशुद्ध पडले होते. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

देशातील प्रशासकीय सेवेतून राजकारणात आलेल्या व्यक्तींमध्ये अजित जोगी यांचे नाव घेतले जाते. छत्तीसगडमध्ये मारवाही विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. 2003मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्याकडे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा देण्यात आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former chhattisgarh cm ajit jogi passed away