
नवी दिल्ली - दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांसाठी मेट्रो भाड्यात ५० टक्के सवलत देण्याची मागणी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी मोफत बस प्रवासाची योजना आणण्याची ही घोषणा केली आहे.