भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनीच उंचावले काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे हात

वृत्तसंस्था
सोमवार, 17 डिसेंबर 2018

मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीच्या या सोहळ्यात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते शिवराजसिंह चौहान मंचावर उपस्थित होते. त्यांनी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचं अभिनंदन करताना त्या दोघांचा हातात हात घेऊन दोघांचेही हात उंचावले.  

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीच्या या सोहळ्यात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते शिवराजसिंह चौहान मंचावर उपस्थित होते. त्यांनी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचं अभिनंदन करताना त्या दोघांचा हातात हात घेऊन दोघांचेही हात उंचावले.  

कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला शिवराज सिंह चौहान आवर्जून उपस्थित होते. त्यांनी दोन्ही नेत्यांचं अभिनंदन केलं. यावेळी कमलनाथ आणि सिंधिया यांनी शिवराज यांना मध्ये उभं केलं. त्यांचे हात हातात घेऊन उंचावले आणि उपस्थितांना अभिवादन केलं. या सोहळ्याच्या निमित्तानं देशाचे दिल असलेल्या मध्य प्रदेशमधील नेत्यांच्या मनाची उदारता पाहायला मिळाली.

निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. यानंतर 11 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल आला आणि तब्बल दीड दशकांपासून भाजपाच्या ताब्यात असलेले मध्य प्रदेश काँग्रेसकडे गेले. यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी तीनही राज्यातील भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. निवडणुकीत जय पराजय हा होतच असतो. मात्र या तीनही राज्यात आधीच्या मुख्यमंत्र्यांनी विकासासाठी जे योगदान दिलं आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, अशा शब्दांमध्ये राहुल यांनी तिन्ही नेत्यांना धन्यवाद दिले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former CM Shivraj Singh Chouhan, Jyotiraditya Scindia and Kamal Nath at swearing in ceremony in Bhopal