राज्यसभेतील काँग्रेसच्या आणखी एका मोठ्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

भुवनेश्‍वर कलिता भाजपमध्ये 

नवी दिल्ली ः कॉंग्रेसचे राज्यसभेतील माजी प्रतोद भुवनेश्‍वर कलिता यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. जम्मू-काश्‍मीरबाबत कॉंग्रेसने घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ त्यांनी नुकताच पदाचा राजीनामा दिला होता. तो स्वीकारण्यात आला होता.

अमेठीच्या राजघराण्याचे वंशज संजयसिंह यांच्यानंतर राजीनामा देऊन भाजपमध्ये जाणारे कलिता हे कॉंग्रेसचे दुसरे राज्यसभा सदस्य आहेत. त्यांची सदस्यत्वाची मुदत नऊ एप्रिल 2020 पर्यंत आहे. भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत कलिता यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Congress Rajya Sabha chief whip Bhubaneshwar Kalita joins BJP