esakal | माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

Former Finance minister Arun Jaitley passes away

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे आज (ता. 24) निधन झाले. अरुण जेटली गेल्या काही दिवसांपासून एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

अरुण जेटलींना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एम्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार केले जात होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. अरुण जेटली यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती.

अरुण जेटली हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. त्यांनी विविध पदे भूषविली होती. 1991 पासून ते भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य राहिले होते. 1999 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी भाजपच्या प्रवक्तेपदाचा पदभारही सांभाळला होता. तसेच अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या (एनडीए-1) कार्यकाळात त्यांनी केंद्रीय अर्थमंत्रिपदही भूषिवले होते.

loading image
go to top