

बेळगाव : कारने रिक्षाला घासल्याचे निमित्त होऊन रिक्षा चालकाने केलेल्या हल्ल्यात गोव्याचे माजी आमदार लवू मामलेदार (वय, ६८) यांचा मृत्यू झाला. शनिवारी (ता. १५) दुपारी खडेबाजारात ही घटना घडली. याप्रकरणी हल्लेखोर रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली असून रिक्षा देखील जप्त केली आहे.