Sumitra Mahajan Accident: सूर्याला अर्घ्य देताना सुमित्रा महाजन यांचा अपघात; डोक्याला पडले चार टाके

शनिवारी घरातील काम करताना तोल जाऊन पडले. डोक्याला दुखापत झाली
former lok sabha speaker sumitra mahajan injured after falling at home got four stitches in her head marathi news
former lok sabha speaker sumitra mahajan injured after falling at home got four stitches in her head marathi newssakal
Updated on

Sumitra Mahajan : इंदौरमधून सात वेळा खासदार आणि लोकसभेच्या अध्यक्षा म्हणून काम पाहिलेल्या सुमित्रा महाजन गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन इंदौर येथील आपल्या घरात तोल जाऊन पडल्यामुळे जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन चार टाके पडल्याची दुर्दैवी घटना घडली . त्या नुकत्याच अमेरिकेवरून परतल्या, आणि शनिवारी सकाळी त्यांना दुखापत झाल्याची घटना घडली आहे.

शनिवारी सकाळी श्रीश्री रविशंकर यांच्या एका कार्यक्रमावरून त्या घरी आल्या, नेहमीप्रमाणे त्या सूर्याला जल अर्पण करण्यासाठी जाताना त्यांच्या पायात दोरी अडकल्यामुळे त्या तोल जाऊन पडल्या. त्यांचा ओरडल्याचा आवाज ऐकून त्यांचे पुत्र मिलिंद त्यांच्यापाशी धावत आले. त्यांनी पाहिले की त्यांच्या आईच्या डोक्याला मार लागल्यामुळे रक्त येत आहे.

former lok sabha speaker sumitra mahajan injured after falling at home got four stitches in her head marathi news
Sumitra Mahajan : अर्ध्या तासात डोंबिवलीत आले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार

त्यांना त्वरित जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिवसभर उपचार घेतल्यानंतर संद्याकाळी त्यांना घरी सोडण्यात आले असून डोक्याचे सिटीस्कॅन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

सुमित्रा महाजन म्हणाल्या...

शनिवारी घरातील काम करताना तोल जाऊन पडले. डोक्याला दुखापत झाली आहे. चार टाके टाकण्यात आले असून आता मी पूर्णपणे बरी आहे. काळजी करण्यासारखं काहीही नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com