esakal | मारुती उद्योग समुहाच्या माजी प्रमुखांचे निधन

बोलून बातमी शोधा

मारुती उद्योग समुहाच्या माजी प्रमुखांचे निधन

मारुती उदयोग समुहाचे माजी संचालक जगदीश खट्टर यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.

मारुती उद्योग समुहाच्या माजी प्रमुखांचे निधन
sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - मारुती उदयोग समुहाचे माजी संचालक जगदीश खट्टर यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खट्टर हे मारुती उद्योग समुहाचे माजी व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांनी 1993 पासून 2007 पर्यंत ही जबाबदारी सांभाळली होती.

खट्टर यांनी 1993 मध्ये मार्केटिंगचे संचालक म्हणून जबाबदारी हाती घेतली होती. त्यानंतर 1999 मध्ये त्यांची सरकारकडून व्यवस्थापकीय संचालक म्हणून शिफारस करण्यात आली होती. तसंच मे 2002 मध्ये सुझुकी मोटर्स कार्पोरेशनसाठीही त्यांचे नाव सुचवण्यात आले होते.