Car Accident : विजापूर-अथणी महामार्गावर माजी आमदाराच्या कारला अपघात; तिघे जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Car Accident Bijapur-Athani Highway

माजी आमदार विजापूरला सिध्देश्वर स्वामी यांच्या भेटीसाठी गेले होते.

Car Accident : विजापूर-अथणी महामार्गावर माजी आमदाराच्या कारला अपघात; तिघे जखमी

अथणी : विजापूर-अथणी राज्य महामार्गावर (Bijapur-Athani Highway) विजापूरहून येताना माजी आमदार के. पी. मग्गेण्णावर यांच्या मोटारीला अपघात झाला. मालवाहू टेम्पो व मग्गेण्णावर यांच्या मोटारीत झालेल्या अपघातात मग्गेण्णावर यांच्यासह तिघे जखमी झाले.

हेही वाचा: Crime News : मोबाईलवर फिल्म दाखवण्याच्या बहाण्यानं सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार; आधी टेरेसवर नेलं अन् तिथं..

काल सायंकाळी घडलेल्या घटनेतील सर्व जखमी मांजरी (ता. चिक्कोडी) येथील आहेत. मोटारीचे चालक अभी व जिन्नप्पा शेडबाळे (रा. मांजरी) अशी अन्य जखमींची नावं आहेत.

हेही वाचा: Indian Hockey Team : मोठी बातमी! महिला प्रशिक्षकाचा विनयभंग; क्रीडा मंत्र्यांविरुध्द गुन्हा दाखल

माजी आमदार मग्गेण्णावर विजापूरला सिध्देश्वर स्वामी यांच्या भेटीसाठी गेले होते. तेथून कागवाडला परतताना बडची गावाजवळ त्यांची मोटार व मालवाहू टेम्पो यांच्यात अपघात झाला. दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाल्याने मग्गेण्णावर यांच्यासह अन्य तिघे जखमी झाले. शिवाय वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Karnatakaaccident case