esakal | माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कोरोनामुक्त; AIIMS मधून मिळाला डिस्चार्ज
sakal

बोलून बातमी शोधा

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कोरोनामुक्त; AIIMS मधून मिळाला डिस्चार्ज

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कोरोनामुक्त; AIIMS मधून मिळाला डिस्चार्ज

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे कोरोना संक्रमित झाले होते. त्यांना सध्या दिल्लीच्या AIIMS Trauma Centre मध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं. ते आता कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना AIIMS मधून डिस्चार्ज करण्यात आलं आहे. याआधी 12 मे 2020 साली प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांचा अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) आला होता.

संक्रमित होण्यापूर्वी मोदींना लिहलं होतं पत्र

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना 18 एप्रिल रोजी एक पत्र लिहिलं होतं. सिंग यांनी लसीकरणाची गती वाढवण्याचा सल्ला दिला होता. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधानांना 5 सल्ले दिले होते. 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनाही लस देण्यास सुरुवात करावी, कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण खूप महत्त्वाचे आहे. किती लोकांना लस दिली यापेक्षा एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकांना लस दिली हे जास्त महत्त्वाचं आहे. पुढील सहा महिन्यात राज्यांना कशापद्धतीने लस पुरवठा करणाचा पुरवठा होईल, याबाबत केंद्राने स्पष्टीकरण द्यावे. सरकारला सांगावं लागेल की, वेगवेगळ्या लस उत्पादक कंपन्यांना किती ऑर्डर देण्यात आली आहे. शिवाय अधिक लोकांना लस द्यायची असेल, तर त्यासाठी अडवान्समध्ये ऑर्डर द्यायला हवी, जेणेकरुन ऑर्डर वेळेत मिळेल, असंही सिंग म्हणाले होते. देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. पुन्हा जनजीवन कसं सुरळित होईल, असं लोकांना वाटू लागलं आहे. महामारीवर मात करण्यासाठी अनेक पर्याय आहेत, पण लोकांचे लसीकरण होणे सर्वात महत्त्वाचे आहे, असंही ते म्हणाले होते.

loading image
go to top