esakal | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना कोराना; स्वत: ट्विटच्या माध्यमातून दिली माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

 pranab mukherjee

खुद्द ट्विटरच्या माध्यमातून दिली माहिती

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना कोराना; स्वत: ट्विटच्या माध्यमातून दिली माहिती

sakal_logo
By
ऑनलाइन टीम

नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. त्यांनी खुद्द ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली. आठवड्याभरात संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ला विलगीकरण करुन घ्यावे तसेच आपली चाचणी करुन घ्यावी, असा उल्लेख त्यांनी ट्विटमध्ये केलाय. काँग्रेसचे दिग्गज नेते राहिलेले 84 वर्षीय प्रणव मुखर्जी यांनी 2012 ते 2017 या कार्यकाळात देशाचे राष्ट्रपतीपद भूषवले होते. 2019 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

कोरोना विषाणूनं देशात अक्षरश: थैमान घातले आहे. दिवसागणिक कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असून यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. ते अद्यापही रुग्णालयातच आहेत. अमित शहा यांच्याशिवाय अर्जुन मेघवाल आणि अन्य काही केंद्रीय मंत्री कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. अनेक राज्यातील मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री  शिवराज सिंह चौहान यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.  

loading image