esakal | ...तर RSS केंद्र सरकारला देशद्रोही म्हणेल का?; रघुराम राजन यांचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

Raghuram Rajan

"...तर RSS केंद्र सरकारला देशद्रोही म्हणाल का?"

sakal_logo
By
सुधीर काकडे

आरबीआयचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी इंफोसिस प्रकरणी आरएसएसच्या भुमिकेवर प्रश्न उपस्थित केला.

'इन्फोसिस' (Infosys) या आयटी कंपनीकडे व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या इन्कम टॅक्सच्या पोर्टलमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अडचणी येत होत्या. यावरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र पांचजन्यमधून वादग्रस्त लिखाण करण्यात आलं होतं. आरबीआयचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) भुमिकेवर आता प्रश्न उपस्थित केला आहे. रघुराम राजन यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाबद्दलच्या सरकारच्या ढिसाळ कारभारावरुन केंद्र सरकारला देशद्रोही म्हटलं जाईल का? असा प्रश्न उपस्थित केला.

आयटी फर्म द्वारे चालवल्या जाणाऱ्या इन्कम टॅक्स पोर्टलवर अडचणी येत असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संबंधीत कंपनीला थेट देशद्रोही म्हटल्याने रघुराम राजन यांनी यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. यावर बोलताना रघुराम राजन यांनी केंद्र सरकारने कोरोना काळात केलेल्या कामावर सुद्धा टीका केली, तसेच त्यावरुन आपण सरकारवर देशद्रोही असल्याचा आरोपल लावाल का असा प्रश्न उपस्थित केला. राजन यांनी यावेळी जीएसटीबद्दल देखील आपले मत व्यक्त केले. जीएसटीचा काहीच फायदा नाही असे आपल्याला वाटत असल्याचे त्यांनी या मुलाखतीत सांगितले. जीएसटीचं चांगलं नियोजन करता आलं असतं मात्र त्यासाठी चुकांमधून शिकायला हवं होतं असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा: इन्फोसिसची देशद्रोह्यांना मदत?;पाहा व्हिडिओ

दरम्यान, गेल्या महिन्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांची बैठक झाली होती. यावेळी नव्या इन्कम टॅक्स पोर्टलमध्ये गोंधळ निर्माण झाल्यावरुन अर्थमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच यावेळी इन्फोसिसला १५ सप्टेंबरपर्यंत सर्व अडचणी सोडवण्याची डेडलाईन देण्यात आली होती. नारायण मूर्ती संस्थापक असलेल्या बंगळुरुस्थित इन्फोसिसवर रा. स्व. संघाच्या मुखपत्रात चार पानांच्या कव्हर स्टोरीमधून टीका करण्यात आली होती. यामध्ये म्हटलं की, "राष्ट्रविरोधी शक्ती भारताच्या अर्थव्यवस्थेवर आघात करण्याचा प्रयत्न करत आहेत." त्यानंतर संघाने या प्रकरणी यु-टर्न घेत स्पष्टीकरण देखील दिलं होतं.

loading image
go to top