दिल्लीत राष्ट्रवादीचा काँग्रेसला धक्का; माजी विधानसभा अध्यक्षांचा NCP प्रवेश| Delhi NCP | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिल्लीत राष्ट्रवादीचा काँग्रेसला धक्का; माजी विधानसभा अध्यक्ष एनसीपीत

योगानंद शास्त्री यांनी गेल्या वर्षी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

दिल्लीत राष्ट्रवादीचा काँग्रेसला धक्का; माजी विधानसभा अध्यक्ष एनसीपीत

दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीचे सदस्यत्व स्वीकारले. योगानंद शास्त्री यांनी गेल्या वर्षी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

योगानंद हे काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांपैकी एक मानले जात होते. मात्र २०२० मध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीआधी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर एक वर्षाने आता त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

loading image
go to top