ओबामा यांचा हॉटेलमधील 'तो' व्हिडिओ व्हायरल; पण...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा व्हिडिओ साडे आठ लाख नेटिझन्सी पाहिला असून, 23 हजाराहून अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत.

नवी दिल्लीः अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे एका हॉटेलमध्ये काम करत आहेत, असा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. परंतु, संबंधित वृत्त खोटे असून, तो व्हिडिओ जुना आहे.

प्रदीप शर्मा नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर ओबामा हे हॉटेलमध्ये काम करत असल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. लाखो नेटिझन्सी तो व्हिडिओ पाहिला. संबंधित पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली. नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागले. पण, संबंधित व्हिडिओ कधीचा आहे, याबाबती माहिती शर्मा यांनी दिली नव्हती.

शर्मा यांनी 13 नोव्हेंबर रोजी व्हिडिओ शेअर केला होता. संबंधित व्हिडिओ साडे आठ लाख नेटिझन्सी पाहिला असून, 28 हजाराहून अधिक शेअर  झाला आहे. यावरूनच संबंधित व्हिडिओ किती व्हायरल झाला आहे, हे समजते.

पण, शर्मा यांनी ओबामांचा शेअर केलेला व्हिडिओ हा 2016 मधील आहे. ओबामा यांनी त्यांच्या घरी निवृत्त लष्करी अधिकाऱयांसाठी भोजनाचे आयोजन केले होते. यावेळी ओबामा यांनी स्वतः अधिकाऱयांना जेवण वाढले होते. यामुळे ओबामा हे हॉटेलमध्ये काम करत असल्याचे वृत्त खोटे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former us president barack obama is not working in a hotel