गुजरात : एटीएस-बीएसएफची मोठी कारवाई, पाकिस्तानी बोटीतून तब्बल 250 कोटींचं हेराॅइन जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat heroin Seized

पाकिस्तानी बोटीतून हेरॉईनचा साठा भारतात आणला जात होता.

एटीएस-बीएसएफची मोठी कारवाई, पाकिस्तानी बोटीतून तब्बल 250 कोटींचं हेराॅइन जप्त

अहमदाबाद : गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये एटीएसकडून (Gujrat ATS) केल्या जाणाऱ्या अंमली पदार्थ विरोधी कारवाईला वेग आलाय. आज पुन्हा एकदा गुजरातमध्ये मोठी कारवाई करत एटीएस आणि बीएसएफनं (Border Security Force) धडक मोहीम राबविली. पाकिस्तानमधील बोटमधून आणण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अंमली साठ्यावर त्यांनी कारवाई केलीय.

मुंद्रा बंदरातून 500 किलोचं कोट्यवधी रुपयांचं कोकेन जप्त केल्याची घटना ताजी असतानाच, आता जखाऊन बंदराजवळ मोठी कारवाई (Jakhau Marine Police) करण्यात आलीय. या कारवाईवेळी तब्बल 250 कोटी रुपये किमतीचं 50 किलो हेरॉईन जप्त (Gujrat heroin Seized) करण्यात आलंय.

हेही वाचा: लष्कराला मोठं यश, पाकिस्तानी दहशतवाद्यासह 'लष्कर-ए-तौयबा'च्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

पाकिस्तानी बोटीतून (Pakistani Boat) हा हेरॉईनचा साठा भारतात आणला जात होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर, एटीएसनं बीएसएफच्या मदतीनं संयुक्त कारवाई केलीय. गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईबाबत माहिती दिली. दरम्यान, एटीएस आणि बीएसएफच्या पथकानं अरबी समुद्रात संशयास्पद बोटींचा पाठलाग केला. त्यानंर ही बोट ताब्यात घेण्यात आली.

Web Title: Found Rs 250 Crore Heroin Dumped By Pakistani Boat Ahmedabad Gujarat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top