Anti Terrorism Squad: गुजरातमधील दहशतवादविरोधी पथकाने अल कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. यामुळे संभाव्य दहशतवादी हल्ला टाळला गेला असून, चौघांच्या मोबाईलवरील संशयास्पद माहितीची चौकशी सुरू आहे.
अहमदाबाद : गुजरातमधील दहशतवादविरोधी पथकाने अल कायदा या संघटनेशी संबंधित असलेल्या चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. यामुळे या संघटनेचे एक ‘मोड्यूल’ उद्ध्वस्त होऊन संभाव्य दहशतवादी हल्ला टाळला गेला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.