गुजरात : गॅस गळती प्रकरणात चौघांना अटक; सूरत गुन्हे शाखेची कारवाई| Surat Gas leakage update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

culprit arrested
गुजरात : गॅस गळती प्रकरणात चौघांना अटक; सूरत गुन्हे शाखेची कारवाई

गुजरात : गॅस गळती प्रकरणात चौघांना अटक; सूरत गुन्हे शाखेची कारवाई

अहमदाबाद : गुजरातच्या सूरतमध्ये (Gujrat-surat) सचिन जीआयडीसी परिसरातील प्रिटिंग मिलमध्ये गुरवारी सकाळी गॅस गळतीची मोठी दुर्घटना (Gas leakage in surat) घडली. या दुर्घटनेत सहा जणांचा (Six people dead) मृत्यू झाला. २३ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सूरत गुन्हे शाखेने (surat crime branch) मोठी कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे. प्रेम सागर गुप्ता, आशिष कुमार गुप्ता, जय प्रताप तोमार आणि विशाल यादव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. (Four culprit arrested by surat crime branch in gas leakage crime)

हेही वाचा: ‘ती आठवण मनात आणली की २० दिवसांत कोरोना नियंत्रणात येईल’

याबाबत सविस्तर वृत्त असं की, आरोपी प्रेम सागर गुप्ताचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. आशिष कुमार गुप्ता बडोद्यात नोकरी करतो तर प्रताप तोमार अंकलेश्वर बॅंकेत काम करतो. तसंच चौथा आरोपी विशाल यादव अंकलेश्वर जीआयडीसीमध्ये गॅरेज चालवतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅसने भरलेला टॅंकर मुंबईतून घाटकोपर-तळोजा येथून आला होता.

मात्र, गॅसने भरलेला टँकर खाली करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. सागर गुप्ताने सूरतमधील सचिन जीआयडीसी परिसरातील एका नाल्यात रसायन टाकले. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच अशाच प्रकारचे आणखी चार टँकर सुरतमधून बाहेर काढले असल्याची माहिती सूरतचे पोलीस आयुक्त अजय तोमार यांनी दिलीय.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :suratcrime update
loading image
go to top