
Belgaum Crime News : बेळगाव शहरातील जोशी मळा, खासबाग परिसरात अत्यंत हृदयद्रावक घटना बुधवारी घडली. एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून, एक तरुणी अत्यवस्थ आहे.
मृतांमध्ये संतोष कुरडेकर (वय ४७), त्यांची आई मंगला गणपत कुरडेकर (वय ८५) आणि बहीण सुवर्णा गणपत कुरडेकर (वय ५२, तिघे रा. जोशी मळा, खासबाग, बेळगाव) यांचा समावेश आहे. संतोष याची दुसरी बहीण सुनंदा कुरडेकर या अत्यवस्थ असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.