
Belgaum Police : जोशी मळा, खासबाग येथील कुटुंबाच्या आत्महत्याप्रकरणी शहापूर पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल झाला असून, त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. राजेश अच्युत कुडतरकर (वय ५२, रा. वडगाव), भास्कर ऊर्फ कृष्णा नारायण सोनार (४७, रा. खासबाग), नानासाहेब हनमंत शिंदे (३५, रा. शहापूर), रिना राजेश कुडतरकर (४०, रा. वडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे असून, यापैकी रिना कुडतकरला वगळून उर्वरित तिघांना शहापूर पोलिसांनी अटक केली आहे.