

France Forest Fire Emergency More Than 220000 Evacuated as Wildfire Approaches Bordeaux Region
sakal
बोर्डो (फ्रान्स) : नैॡत्य फ्रान्समध्ये लागलेल्या भीषण वणव्यामुळे परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. निसर्गाच्या या प्रकोपापुढे नागरिक आणि अग्निशामक दलांचे प्रयत्न अपुरे पडताना दिसत आहेत. प्रशासनाने तातडीने पावले उचलत आणखी ५५,००० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत एकूण २,२०,००० हून अधिक लोकांना आपली घरे सोडून सुरक्षित आश्रयाला जावे लागले आहे. सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे, ही विनाशकारी आग आता प्रसिद्ध ‘वाइनची राजधानी’ म्हणून ओळख असलेल्या ‘बोर्डो’ शहराच्या दिशेने वेगाने सरकत आहे.