

Government Offers Free Heart Checkups and Surgery for Children Born With Congenital Heart Disease Under a Special Health Initiative
esakal
जन्मजात हृदयविकार असलेल्या ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना वेळेवर निदान आणि उपचार मिळावेत, यासाठी झारखंडच्या आरोग्य विभागातर्फे विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २९ ऑक्टोबर रोजी लातेहार येथील टाऊन हॉलमध्ये, तर ३० ऑक्टोबर रोजी रांची येथील रिम्स सभागृहात हे शिबिर भरवण्यात येणार आहे. दोन्ही ठिकाणी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत मुलांची तपासणी केली जाईल.