माफी किंवा 100 रुपयांचा दंड यापेक्षा तुरुंगात जाणं होतं महत्त्वाचं!

mathai manjooran1.jpg
mathai manjooran1.jpg

'100 रुपयांचा दंड भरा किंवा न्यायालयाचा अवमान केल्याच्या गुन्ह्याखाली तुरुंगात जा' न्यायालयाने हा निर्णय (Court Verdict) दिल्यानंतर आरोपीच्या पिंजऱ्यातून आवाज आला, मी दंड भरण्याऐवजी तुरुंगात जाणे पसंद करेन. 61 वर्षांपूर्वीचा हा खटला, केरळ उच्च न्यायालयात (Kerala High Court) चालला होता. 

1959 साली, पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक मथाई मंजूरन (Mathai Manjooran) माध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी उभे राहिले होते आणि न्यायालयाच्या अवमानप्रकरणी त्यांनी माफी मागण्यास नकार दिला होता. दंड भरुन सुटण्यात त्यांना कोणताही रस नव्हता. शिवाय माध्यम स्वातंत्र्यासाठी त्यांनी तुरुंगात जाणं पसंद केलं. 

62 वर्षांपूर्वी केरळच्या त्रिशूरमध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसा झाली होती. यात 6 काँग्रेस कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती दैनिक वृत्तपत्र केरळ प्रकाशममध्ये विस्ताराने 29 जूलै 1958 मध्ये छापण्यात आली होती. यामध्ये न्यायालयावर टिप्पणी करण्यात आली होती. ही माहिती छापल्यानंतर संपादक मंजूरन आणि प्रकाशक सुधाकरण यांच्याविरोधात न्यायालयात अवमानाचा खटला चालला. 

मंजूरन आणि सुधाकरण यांनी आपल्या शपथपत्रात त्यांच्यावरील आरोप मानण्यास नकार दिला. तसेच दोघांनीही माफी मागण्यास नकार दिला. जवळजवळ एक वर्ष खटला चालल्यानंतर न्यायालयाने मंजूरन आणि सुधाकरण यांना दोषी ठरवलं. मात्र, पत्रकाराला तुरुंगात पाठवण्याबाबत न्यायालय कचरत होते. त्यामुळे न्यायालयाने 100 रुपये दंड भरण्याचा पर्याय त्यांच्यासमोर ठेवला. सोबत, सुधाकरण यांच्यासाठी 15 दिवसांत 50 रुपये देण्याचा पर्याय खुला ठेवला. पण, दोघांनीही बोलण्याचे स्वातंत्र्य आणि माध्यम स्वातंत्र्याच्या अधिकारासाठी तुरुंगात जाणे पसंद केले. त्यामुळे दोघांना त्रिशूरच्या वियुर तुरुंगात पाठवण्यात आले. पण ही गोष्ट येथेच संपली नाही...

स्वराज चौकात मंजूरन यांचा सत्कार

मंजूरन जेव्हा तुरुंगाची शिक्षा भोगून सूटले, त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी आणि मित्रांनी लोकांच्या उपस्थितीत तुरुंगापासून जवळच असलेल्या स्वराज चौकात त्यांचा सत्कार केला. अशाच प्रकारचा सत्कार मंजूरन यांच्या गावी एर्नाकुलम आणि कोट्टायम येथेही करण्यात आला. 

मंजूरन- देशाने विसरलेले एक नायक

यावर्षी 14 जानेवारीला मंजूरन यांची 50 वी पुण्यतिथी होती. यावेळी त्यांना कोणत्याही खास पद्धतीने आठवण्यात आले नाही. मंजूरन यांनी लग्न केले नव्हते. मुलं नसल्याने त्यांचे नाव आणि त्यांचे कार्य पुढे येऊ शकले नाही. वकील ए जयशंकर यांनी आपल्या पुस्तकात 1992 साली जन्मलेल्या मंजूरन यांच्या जीवनाबाबत सांगितलं आहे. मंजूरन एक स्वातंत्र्यसैनिक , जोशीले वक्ता आणि समाजवादी क्रांतीकारक होते.

अमेरिका पुन्हा पेटली; कृष्णवर्णीयावरील गोळीबारानंतर आंदोलनाला हिंसक वळण

15 वर्षाचे असताना मंजूरन यांनी सायमन कमीशन विरोधात 1928 साली झालेल्या आंदोलनामध्ये भाग घेतला होता. जयशंकर यांच्या पुस्तकानुसार, मैसूरमधून स्फोटके घेऊन जाऊन कोझिकोडेमध्ये बॉम्ब बनवण्याच्या क्रांतीकारकांच्या धाडसामागे मंजूरन यांचेच डोके होते. केरळ समाजवादी पक्षाचे संस्थापक मंजूरन डाव्या पक्षांचे टीकाकार होते, पण नंबूदरीपाद सरकारमध्ये 1967 ते 1969 या काळात त्यांना कामगार मंत्री बनवण्यात आले होते.

दरम्यान, ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्याविरोधात न्यायालयात सुरु असणाऱ्या अवमान याचिकेच्या पार्श्वभूमीवर ए जयशंकर यांनी मथाई मंजूरन यांची आठवण काढली. प्रशांत भूषण हे आताच्या काळातील मंजूरन आहेत, असं ते म्हणाले.

(edited by- kartik pujari)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com