
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील कॉंग्रेसच्या सुमार कामगिरीबाबत पक्षाच्या महिला खासदारांनी थेट राहुल आणि प्रियांका गांधी यांच्याकडेच आपले गाऱ्हाणे मांडल्याचे समजते.
महाविकास आघाडीतील मित्रपक्षांकडून अडचणीत आणण्याचे प्रकार घडले, काँग्रेस पक्ष संघटनेतही मोठा गोंधळ पाहायला मिळाला. जबाबदार नेत्यांनी स्वतः ला भावी मुख्यमंत्री मानून आपल्या जवळच्या व्यक्तींना उमेदवारी वाटप केल्याने हे अपयश आल्याचे सांगण्यात आल्याचे कळते.