
हमीरपूर/उना : मधुमक्षिका पालनाच्या व्यवसायातून हिमाचल प्रदेशातील युवकांचे आयुष्य बदलून गेल्याचे चित्र आहे. केवळ एक लाख रुपये गुंतवून मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय सुरू करणारा उना येथील अनुभव सूद आता ३० लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न कमावून परिसरातील एक यशस्वी आत्मनिर्भर उद्योजक झाला आहे.