lakhpati didi in republic day parade
sakal
डेहराडूनमधील शंकरपूर गावातील संतोषी सोलंकी यांची यशोगाथा आज संपूर्ण उत्तराखंडसाठी अभिमानाचा विषय ठरली आहे. एक सामान्य ग्रामीण महिला ते 'लखपति दीदी' आणि आता प्रजासत्ताक दिन २०२६ च्या परेडसाठी 'विशेष अतिथी' म्हणून मिळालेले निमंत्रण, हा त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.
नवी दिल्लीतील ७७ व्या प्रजासत्ताक दिन परेडसाठी देशभरातील निवडक कर्तृत्ववान व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये उत्तराखंडच्या संतोषी सोलंकी यांची निवड होणे, हे राज्यातील महिला सक्षमीकरणाचे मोठे यश मानले जात आहे.