btech panipuriwali tapasi upadhyay thailand
sakal
जिद्द, चिकाटी आणि नाविन्यपूर्ण विचार असेल तर माणूस शून्यातून विश्व निर्माण करू शकतो, हे मेरठच्या तापसी उपाध्याय हिने सिद्ध करून दाखवले आहे. दिल्लीच्या रस्त्यावर बुलेटला पाणीपुरीचा गाडा जोडून 'बीटेक पाणीपुरी वाली' म्हणून प्रसिद्ध झालेली २४ वर्षीय तापसी आता जागतिक स्तरावर एक 'रोल मॉडेल' बनली आहे. नुकत्याच थायलंडमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तापसीने 'मिस फिटनेस मॉडेल इंटरनॅशनल' हा मानाचा किताब पटकावून भारताची मान उंचावली आहे.