Video: भाषण ऐकताना तंबाखू मळणाऱयाने मारली टाळी अन्...

वृत्तसंस्था
Friday, 14 August 2020

भाषण सुरू असताना एकाने तंबाखू मळताना हातावर जोरात हात मारला आणि उपस्थितही टाळ्या वाजवायला लागले. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला असून, नेटिझन्स पोट धरून हसत आहेत.

नवी दिल्ली: भाषण सुरू असताना एकाने तंबाखू मळताना हातावर जोरात हात मारला आणि उपस्थितही टाळ्या वाजवायला लागले. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला असून, नेटिझन्स पोट धरून हसत आहेत.

बॅले डान्सचा व्हिडिओ पाहून मिळाली कौतुकाची थाप अन्...

अरुण बोथरा यांनी ट्विटरवरून व्हिडिओ शेअर केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक भाषण सुरू असते. उपस्थितांमधील एका व्यक्ती तंबाखू काढतो आणि हातावर मळायला सुरवात करतो. मळत असताना हातावर जोरात थाप मारतो. यामुळे टाळीचा आवाज येतो आणि उपस्थितही टाळ्या वाजवायला सुरवात करतात. टाळ्या वाजवणाऱयांनाही आपण टाळ्या का वाजतो, हे माहित नव्हते. शिवाय, भाषण करणाऱया व्यक्तीलाही याबाबत काही समजले नाही. प्रतिसाद म्हणून उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या असाव्यात, असे त्यांना वाटले असेल. पण, संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स पोट धरून हसत आहेत. शिवाय, प्रतिक्रियांच्या माध्यमातूनही व्यक्त होताना दिसतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: funny video viral man preparing tobacco during speech and people applauding

Tags
टॉपिकस
Topic Tags: