G Ranganathan
esakal
चेन्नई : मध्य प्रदेशात घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर अखेर निष्पाप २१ बालकांचे प्राण (Madhya Pradesh Deaths) घेणाऱ्या घातक कफ सिरप प्रकरणात मुख्य आरोपी हाती लागला आहे. विषारी ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरप तयार करणाऱ्या कंपनीचा मालक जी. रंगनाथन यांना (G Ranganathan) चेन्नईतून अटक करण्यात आलीये. मध्य प्रदेश पोलिसांच्या सात सदस्यीय विशेष पथकानं ही कारवाई केली. हे घातक कफ सिरप ‘स्रेसन फार्मास्युटिकल्स’ या कंपनीनं तयार केलं होतं.