

yogi adityanath charkha on gandhi jayanti.
esakal
लखनौ: महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त उत्तर प्रदेशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. लखनौमधील हजरतगंज येथील जीपीओ पार्कमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गांधी आश्रमाला भेट दिली आणि चरखा चालवला. यावेळी त्यांनी स्वदेशी, खादी आणि स्वावलंबनाचे महत्त्व अधोरेखित केले.