Amit Shah Lok Sabha: घरच्या मैदानात गृहमंत्र्यांचा विजयी हुंकार! अमित शहांना ३ लाखांपेक्षाही मोठी आघाडी

Gandhi Nagar Lok Sabha: गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून गृहमंत्री अमित शाह आघाडीवर आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल येऊ लागले आहेत.
Gandhi Nagar Lok Sabha
Gandhi Nagar Lok Sabhaesakal

गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून गृहमंत्री अमित शाह आघाडीवर आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल येऊ लागले आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये एनडीए (NDA) आणि INDIA आघाडी यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगर लोकसभा जागेवर एकतर्फी लढत पाहायला मिळाली. येथे गृहमंत्री अमित शाह 3 लाखांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या उमेदवार सोनल रमणभाई पटेल यांना अद्याप एक लाख मतांचा आकडा गाठता आलेला नाही. शाह दुसऱ्यांदा येथून विजयाच्या वाटेवर आहेत.

गांधीनगरची जागा 1989 पासून भाजपकडे

गांधीनगर लोकसभा जागा 1967 साली अस्तित्वात आली. तेव्हापासून 1984 पर्यंत ही जागा काँग्रेसकडेच राहिली. 1977 मध्येच जनता पक्षाचे पुरुषोत्तम मावळणकर निवडणूक जिंकले होते.

1989 मध्ये भाजपच्या शंकरसिंह वाघेला यांनी पहिल्यांदाच निवडणूक जिंकल्यानंतर येथे खाते उघडले. तेव्हापासून ही जागा भाजपच्या हातात राहिली.

Gandhi Nagar Lok Sabha
Lok Sabha Election Result: काँग्रेस नेतृत्त्वाची नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंशी चर्चा सुरु? दिल्लीत हालचालींना वेग

भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी यांनी येथून ६ वेळा निवडणूक जिंकली आहे. १९९६ मध्ये अटलबिहारी वाजपेयीही येथून विजयी झाले होते.

2019 मध्ये अमित शाहांना 8 लाखांहून अधिक मते मिळाली होती

2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांना गांधीनगर मतदारसंघातून 8.94 लाख मते मिळाली होती. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे चतुरसिंह जानवजी चावडा होते, त्यांना ३.३७ लाख मते मिळाली.

Gandhi Nagar Lok Sabha
Odisha Election Result: ओडिशामध्ये मोदीराज? नवीन बाबू पिछाडीवर, भाजपला मिळालं बहुमत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com