क्लाससाठी बाहेर गेली अन्...

वृत्तसंस्था
Friday, 28 February 2020

- या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली. तर इतर तिघांचा शोध सुरु.

पटना : बलात्काराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यानंतर आता बिहारच्या पटना येथे धक्कादायक घटना घडली. कोचिंग क्लाससाठी घराबाहेर पडलेल्या विद्यार्थिनीचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पीडित विद्यार्थिनी 15 वर्षांची असून, सातवीत शिक्षण घेत आहे. जेव्हा ती कोचिंग क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्याचदरम्यान 4 जणांनी तिचं अपहरण केले. त्यानंतर अज्ञातस्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

बेशुद्ध अवस्थेत आढळली पीडिता

क्लासला गेलेली मुलगी बराच वेळ झाला तरी घरी परतली नाही. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबियांनी सगळीकडे शोधाशोध केली. त्यानंतर ती घराजवळच्या एका गार्डनमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली. 

Vodafone-Idea घेणार मोठा निर्णय; 1 जीबी डाटासाठी...

आरोपीस अटक

या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा तात्काळ शोध घेत बेड्या ठोकल्या. तर इतर तीन आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gang Rape on Minor Girl in Patna