कुख्यात गुंड विकास दुबे CCTV कॅमेऱ्यात कैद; पण...

टीम ई-सकाळ
बुधवार, 8 जुलै 2020

त्याने काळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स पॅन्ट घातली होती. तसेच तोंडाला मास्कही बांधला होता. त्याच्या खांद्यावर एक बॅगही दिसून आली.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये पोलिसांवर हल्ला करुन पसार झालेल्या कुख्यात गुंड विकास दुबेचा पोलिस शोध घेत आहेत. त्याची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून एक लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. फरीदाबादमध्ये विकास दुबे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आले आहे. पोलीस घटनास्थळी पोहचण्यापूर्वी एका मिठाईच्या दुकानासमोरुन तो ऑटो रिक्षामधून निघून गेल्याचे व्हिडिओ प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाले आहेत.मिठाईच्या दुकानासमोर विकास दुबे जवळपास पाच मिनट उभा होता. मिटाईच्या दुकानामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असल्याचे लक्षात आल्यानंतर तो सावध झाला. पण तोपर्यंत त्याची सर्व हालचाल सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. त्याठिकाणी तीन ऑटो आल्या पहिल्या दोन ऑटोमध्ये न बसता तो तिसऱ्या ऑटोमध्ये बसून निघून गेला. त्याने काळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स पॅन्ट घातली होती. तसेच तोंडाला मास्कही बांधला होता. त्याच्या खांद्यावर एक बॅगही दिसून आली. त्यामुळे सामान सोबत घेऊन तो पोलिसांपासून लपत असल्याचे समोर आले. 

विकास दुबेच्या खास साथीदाराचा पोलिसांकडून खात्मा

विकास दुबे बदखल चौक परिसरातील एका छोट्या हॉटेलमध्ये थांबला होता. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विकासने आपली ओळख अंकुर अशी करुन दिली होती. पोलिस याठिकाणी पोहचण्यापूर्वी त्याने इथून पलायन केले. त्याचे काही साथीदार मात्र पोलिसांच्या जाळ्यात अडकले. दिल्‍ली-एनसीआरच्या वेगवेगळ्या भागात त्याचा शोध घेण सुरु आहे. कानपूरमधील पोलिसांच्या हल्ल्यातील मुख्य सुत्रधार असलेला विकास दुबेने फरीदाबादमधील Oyo (ओय) हॉटेलशिवाय सेक्टर 87 मधील न्यू इंदिरा कॉलनीत असलेल्या आपल्या नातेवाईकांच्या घरी 2-3 दिवस मुक्काम ठोकला होता. याप्रकरणात फरीदाबाद गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तिघांना अटक केली आहे. विकास दुबेसोबत असलेल्या प्रभात आणि अंकुर या दोघांना फरीदाबादमधून अटक करण्यात आली आहे.  कार्तिकेय उर्फ प्रभात हा विकास दुबेच्या गावातील रहिवाशी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 4 हत्यारे जप्त केली आहेत. त्यातील दोन पिस्तूल या युपी पोलिसांच्या आहेत. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कानपूरमधील पोलिसांच्या हल्ल्यातील मुख्य सुत्रधार असलेला विकास दुबे फरीदाबादमधील Oyo (ओय) हॉटेलशिवा सेक्टर 87 मधील न्यू इंदिरा कॉलनीत असलेल्या आपल्या नातेवाईकांच्या घरी 2-3 दिवस मुक्काम केल्याचेही समोर येत आहे. याप्रकरणात फरीदाबाद गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तिघांना अटक केली आहे. विकास दुबेसोबत असलेल्या प्रभात आणि अंकुर या दोघांना फरीदाबादमधून अटक करण्यात आली आहे.  कार्तिकेय उर्फ प्रभात हा विकास दुबेच्या गावातील रहिवाशी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 4 हत्यारे जप्त केली आहेत. त्यातील दोन पिस्तूल या युपी पोलिसांच्या आहेत. 

कानपूरामध्ये पोलिसांच्या पथकावर हल्ला करणाऱ्या विकास दुबेच्या गँगमधील त्याचा राइट हॅण्ड आणि शार्प शूटर अमर दुबेचा युपी पोलिसांच्या एसटीएपने हमीरपूरच्या मौदहा परसरात एन्काउंटर केला. विकास दुबे फरार झाल्यापासून शोधमोहिमेदरम्यान पोलिस आणि त्याच्या टोळीतील पाच जणांसोबत पोलिसांची चमकम झाली आहे. या पोलिसांनी तिघांचा खात्मा केला असून दोघे पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची कसून चौकशी सुरु असून या प्रकरणातील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UP gangster Vikas Dubey spotted near Delhi CCTV footage went viral