5G in India : गौतम अदानी एअरटेल-जिओला देणार टक्कर! मिळाला परवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adani

5G in India : गौतम अदानी एअरटेल-जिओला देणार टक्कर! मिळाला परवाना

Adani Data Network License : एअरटेल आणि जिओला भारतात 5G सेवांच्या क्षेत्रात तगडी स्पर्धा करावी लागणार आहे. कारण, आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांची कंपनी अदानी डेटा नेटवर्क्स लिमिटेडला दूरसंचार क्षेत्रासाठी एकत्रित परवाना मिळाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा: MiG 29K Crashed : नौदलाचे MiG-29K गोव्यात क्रॅश, वैमानिक सुखरूप

या परवान्यानंतर आता अदानींची कंपनी जिओ आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी सज्ज झाल्याची चर्चा आहे. अदानी डेटा नेटवर्कला सोमवारी हा परवाना देण्यात आला असून, ADNL ला 5G स्पेक्ट्रमच्या लिलावात 212 कोटी रुपयांना 20 वर्षांसाठी 26GHz mm वेव्ह बँडमध्ये 400MHz स्पेक्ट्रम वापरण्याचा अधिकार मिळाला आहे. कंपनीने देशात नुकत्याच झालेल्या 5G स्पेक्ट्रम लिलावात बोली लावली होती. तेव्हापासून अदानी समूह भारतातील दूरसंचार क्षेत्रात प्रवेश करण्याच्या तयारीत होता.

हेही वाचा: सर्व ठाकरेंनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ; बाळासाहेबांच्या नातवाने व्यक्त केली इच्छा

अदानी समूह पूर्वीपासून बंदर, कोळसा, ऊर्जा, वीज वितरण आणि विमान वाहतूक क्षेत्रात अस्तित्वात आहे. त्यानंतर आता कंपनीने टेलिकॉम क्षेत्रात पाऊलं ठेवलं असून, अदानींची थेट स्पर्धा रिलायन्स जिओशी होणार आहे.

जिओ आणि एअरटेलला टक्कर

सध्या या परवान्याबाबत अदानी समूहाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र आता कंपनी दूरसंचार क्षेत्रातही विस्तार करून बाजारात याआधीपासून असलेल्या जिओ आणि एअरटेलला तगडी टक्कर देणार असल्याचे बोलले जात आहे.