Gautam Adani : गौतम अदानी बनले जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा


Gautam Adani

Gautam Adani : गौतम अदानी बनले जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती

नवी दिल्ली : अदानी ग्रुपचे चेअरमन आणि भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे जगातील दुसऱ्या क्रमांकवरील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलेनिअर लिस्टनुसार ते दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाले आहेत. बर्नार्ड अर्नाल्ट यांना त्यांनी मागे टाकत त्यांची जागा घेतली आहे. (Gautam Adani is now worlds second richest person)

गौतम अदानी यांची निव्वळ संपत्ती ही १५३.९ बिलियन डॉलर इतकी आहे. तर अर्नाल्ट यांची निव्वळ संपत्ती १५३.७ बिलियन डॉलर आहे. फोर्ब्सच्या डेटानुसार अदानी हे आता केवळ अॅलन मस्क यांच्याच एक पाऊल मागे आहेत. मस्क यांची संपत्ती सर्वाधिक २७३.५ बिलियन डॉलर इतकी आहे. दरम्यान, भारताचे दुसरे एक उद्योगपती मुकेश अंबानी या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत. त्यांची निव्वल संपत्ती ९१.९ बिलियन डॉलर इतकी आहे.

अदानी ग्रुप भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा ग्रुप

गौतम अदानी हे पहिल्या पिढीतील उद्योजक आहेत. त्यांच्या अदानी समूहामध्ये ऊर्जा, बंदरे आणि लॉजिस्टिक्स, खाणकाम आणि संसाधने, गॅस, संरक्षण आणि एरोस्पेस आणि विमानतळ या व्यवसायांसह 7 सार्वजनिक उद्योगांचा समावेश आहे. अदानी समूह हा भारतातील तिसरा सर्वात मोठा समूह (रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा समूहानंतर) आहे.

अनेक क्षेत्रात अदानींच्या उद्योगांचा पसारा

अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशन या अदानी समूहाच्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आहेत. गेल्या 5 वर्षांत अदानी एंटरप्रायझेसने विमानतळ, सिमेंट, तांबे शुद्धीकरण, डेटा सेंटर्स, ग्रीन हायड्रोजन, पेट्रोकेमिकल रिफायनिंग, रस्ते आणि सौर सेल उत्पादन अशा नवीन वाढीच्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. आता अदानी दूरसंचार क्षेत्रात प्रवेश करण्याची योजना आखत आहे. तसेच ग्रीन हायड्रोजन आणि विमानतळ व्यवसाय वाढवण्याच्या त्यांच्या मोठ्या योजना आहेत.

Web Title: Gautam Adani Is Now Worlds Second Richest Person

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Desh newsgautam adani