Gautam Adani : राहुल गांधींची धोरणे विकासविरोधी नाहीत; अदानींचं मोठं विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi and Gautam Adani

Gautam Adani : राहुल गांधींची धोरणे विकासविरोधी नाहीत; अदानींचं मोठं विधान

मुंबई - जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांच्याविषयी करण्यात येणाऱ्या दावाव्यांवर ते स्पष्ट बोलले. आमच्या व्यवसायाची भरभराट पंतप्रधान नरेंद्र मोदीशी जवळीक असल्याने होते, या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं अदानी म्हणाले. gautam adani news in Marathi

हेही वाचा: Bachchu Kadu : 'आता एक घाव दोन तुकडे' मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने बच्चू कडू चिडले

गौतम अदानी म्हणाले की, भाजपची सत्ता नसलेल्या अनेक राज्यांमध्ये आम्ही काम करत आहोत. या राज्यांमध्ये सर्वात जास्त गुंतवणूक आहे. अदानी समूहाची गुंतवणूक आज २२ राज्यांमध्ये आहे. या सर्व राज्यांमध्ये भाजपची सरकारे नाहीत. केरळमध्ये डाव्या आघाडीचे सरकार, बंगालमध्ये ममतादीदी, नवीन पटनायकजी, जगनमोहन रेड्डी, केसीआर यांच्यासोबतही आम्ही काम करत आहोत.

जिथे जिथे प्रादेशिक पक्षांची सरकारं आहेत, तिथे आम्ही काम करत आहोत... मी आज आत्मविश्वासाने सांगू शकतो की, यापैकी कोणत्याही सरकारने आमच्यासमोर कोणतीही समस्या निर्माण केली नाही, असही अदानी यांनी म्हटलं.

हेही वाचा: Bachchu Kadu : 'आता एक घाव दोन तुकडे' मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने बच्चू कडू चिडले

"मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मोदीजींकडून कोणतीही वैयक्तिक मदत घेऊ शकत नाही... तुम्ही त्यांच्याशी धोरणाबद्दल बोलू शकता, देशहितासाठी चर्चा करू शकता, पण जे धोरण तयार केलं जातं ते प्रत्येकासाठी आहे, ते एकट्या अदानी समूहासाठी नाही, असही अदानी म्हणाले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी क्रोनी कॅपिटलिझमबाबत केलेल्या आरोपावर अदानी म्हणाले की, तो राजकारणाच्या कार्यपद्धतीचा एक भाग आहे, असे मला वाटते.

हेही वाचा: Yogesh Kadam Accident : अपघातप्रकरणी रामदास कदम यांना घातपाताचा संशय; अनिल परबांचं नाव घेऊन म्हणाले...

काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानचे उदाहरण यावेळी अदानी यांनी दिले. काँग्रेसशासित राजस्थानमध्ये करण्यात आलेल्या ६८ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा उल्लेख करून अदानी म्हणाले, 'गुंतवणूक करणे हे आमचे सामान्य काम आहे... राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निमंत्रणावरून मी गुंतवणूकदार परिषदेतसाठी तिथे गेलो होतो... नंतर राहुल (गांधीनींही राजस्थानमधील आमच्या गुंतवणुकीचे कौतुक केले... राहुल यांची धोरणेही विकासविरोधी नाहीत, हे मला माहीत असंही अदानी यांनी म्हटलं.