Vinod Adani: गौतम अदानीचे बंधू सर्वांत श्रीमंत NRI; दिवसाला कमावतात 102 कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vinod Ambani

Vinod Adani: गौतम अदानीचे बंधू सर्वांत श्रीमंत NRI; दिवसाला कमावतात 102 कोटी

नवी दिल्ली : देशातील मोठे उद्योगपती गौतम अदानी हे जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. तर त्यांचे मोठे बंधू विनोद शांतीलाल अदानी हे सर्वांत श्रीमंत NRI (अनिवासी भारतीय) बनले आहेत. IIFLच्या वेल्थ हिरून इंडिया रिचलिस्टमधून ही माहिती समोर आली असून ते दिवसाला जवळपास १०२ कोटी एवढी कमाई करतात.

(Vinod Adani is Richest NRI Who Earn 102 Crore Per Day)

जगातील दुसरे सर्वांत श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांचे मोठे बंधू विनोद अदानी हे दुबईत राहतात. ते दुबई, सिंगापूर आणि जकार्ता येथे व्यापार आणि व्यवसायाचे व्यवस्थापनाचं काम करतात. गेल्या वर्षी त्यांची संपत्ती 28 टक्क्यांनी म्हणजेच 37,400 कोटी रुपयांनी वाढली आणि भारतातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत सहाव्या स्थानावर मजल मारली होती. गेल्या पाच वर्षांत त्यांची संपत्ती तब्बल 850 टक्क्यांनी म्हणजे 151,200 कोटी रुपयांनी वाढून 169,000 कोटी रुपये झाली आहे. तर त्यांनी आता सर्वांत श्रीमंत अनिवासी भारतीय होण्याचा मान मिळवला आहे.

हेही वाचा: United Nations: दहशतवादावरून परराष्ट्र मंत्र्यांनी चीन, पाकिस्तानला खडसावले

तर अनिवासी सर्वांत श्रीमंतांच्या यादीत हिंदुजा ब्रदर्स हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती १.६५ लाख कोटी इतकी आहे. त्यानंतर एल.एन. मित्तल हे १.५ लाख कोटी संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर जय चौधरी, अनिल अग्रवाल, युसूफ अली. पल्लोंजी मिस्त्री, श्रीप्रकाश लोहिया, राकेश गंगवाल यांचा क्रमांक लागतो.

टॅग्स :Indiagautam adaniRich