

buddha pournima kushinagar travel pointes
esakal
कुशीनगर येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या 2570 व्या जयंतीनिमित्त महापरिनिर्वाण मंदिर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी देश-विदेशातून आलेल्या भाविक आणि बौद्ध भिक्षूंच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर आध्यात्मिक वातावरणात न्हाऊन निघाला. तसेच, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी संबोधित करताना भगवान बुद्धांचे संदेश जागतिक शांतता आणि मानव कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तसेच, जागतिक स्तरावर काही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्यावरचा उपाय भारतभूमी आणि बुद्धांच्या विचारांतूनच मिळू शकतो.